*कोकण Express*
*नांदगाव पंचक्रोशी आणि देवगड तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय…*
*तुतारी एक्सप्रेसला नांदगाव रेल्वे स्टेशनमध्ये थांबा द्या…*
*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी*
*कणकवली ः प्रतिनीधी*
नांदगाव पंचक्रोशी आणि देवगड तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय व मागणी लक्षात घेऊन 11003/11003 तुतारी एक्सप्रेसला कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे थांबा मिळावा अशी मागणी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांचेकडे भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे. तसेच रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म वर पत्रा शेड नसल्यामुळे पावसात प्रवाशांना खूप त्रास होतो तरी सर्व स्थानकांवर पत्रा शेड करण्यात यावी त्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या प्रमुख रेल्वेस्थानकांना प्राधान्य देण्यात यावे अशीही मागणी तेली यांनी केली आहे.

