*कोकण Express*
*उमेद फाउंडेशनमार्फत ओझरम नं.१ वसतिगृहातील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*तळेरे ः प्रतिनिधी*
उमेद फाउंडेशन सेवा परिवार यांच्याकडून ओझरम येथील शाळेत शिकणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थांना उमेदचे संस्थापक प्रकाश गाताडे, गावचे सरपंच प्रशांत राणे, तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, कासार्डे केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पवार, खारेपाटण केंद्राचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, साळीस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख गोपाळ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी उमेदचे संस्थापक प्रकाश गाताडे म्हणाले की, आम्हांला शिक्षण घेताना ज्या अडचणी आल्या, तशा अडचणी या विद्यार्थांना येऊ नयेत यासाठी तसेच निराधार, गरीब व वंचित मुलांकरीता उमेद जाणीवपूर्वक काम करते. या समयी उमेदचे संस्थापक सदस्य नवीनचंद्र सनगर, राजाराम पात्रे, प्रदिप नाळे, नितीन पाटील, युवराज पचकर, विक्रम म्हाळुंगेकर, जाकीर शेख, श्रीराम विभूते, सामाजिक कार्यकर्ते बंडू राणे, तेजस साळुंखे, मुख्या. स्नेहल कदम, विनायक जाधव आणि केंद्रातील शिक्षक वर्ग उपस्थित होते.
उमेश फाउंडेशनने यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 300 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृद्धाश्रम तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यांसारखे सुद्धा उमेदचे उपक्रम गरजूंसाठी सातत्याने सुरू आहेत. उमेद फाउंडेशनने वसतिगृहातील व शाळेतील विद्यार्थाना शै. साहित्य वाटप केल्याबद्दल शा. व्य. समिती, मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांनी आभार व्यक्त केले.

