लोकसंख्या विस्फोटाला सरकार जबाबदार नाही* प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले

लोकसंख्या विस्फोटाला सरकार जबाबदार नाही* प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले

*कोकण Express*

*लोकसंख्या विस्फोटाला सरकार जबाबदार नाही*
प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले*

*फोंडाघाट ः प्रतिनीधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये अर्थशास्त्र व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकात बोलताना डॉ. बालाजी सुरवसे म्हणाले की लोकसंख्येचा विस्फोट ही जागतिक समस्या बनली आहे. वाढती लोकसंख्या आणि नैसर्गिक साधन संपत्ती याचे होणारे व्यस्त प्रमाण मानव जातीला घातक आहे.

विद्यार्थ्यांच्या मनोगत खुशी कामतेकर म्हणाली की साधन संपत्ती आणि लोकसंख्या याचे समान प्रमाण असले पाहिजे जन्मदर व मृत्युदर यातील फरकही लोकसंख्या विस्फोटाला कारणीभूत ठरले आहे. लोकसंख्या विस्फोटामुळे अन्न, वस्त्र, निवारा , बेरोजगारी अशा अनेक समस्या उद्भवतात. असे मत व्यक्त केले .

आपल्या मार्गदर्शनात डॉ. राजाराम पाटील म्हणाले की लोकसंख्या ही पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाची साधन संपत्ती आहे. दोन दशलक्ष वर्षा पासून मानव जात अस्तित्वात आहे. सर्व सजीवांचे वास्तव्य म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्येची गणना प्रथम कॅनडामध्ये सुरू झाली. लोकसंख्येच्या बाबतीत झालेली स्थित्यंतरे ही मोठ्या प्रमाणात आहेत. लोकसंख्या अभ्यासासाठी आकडेवारी पुरवणारे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे जनगणना होय. म्हणून १८७२ मध्ये पहिली जनगणना झाली. लोकसंख्या विस्फोटाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी लहान कुटुंबाचे महत्त्व समजून सांगणे, मुलींच्या शिक्षणावर भर देणे. महिलांच्या आरोग्याचा विचार करणे. आर्थिक उन्नती करणे तसेच अंधश्रद्धा मधून बाहेर पडणे या सारख्या गोष्टींचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले.

आपल्या अध्यक्ष मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु फुलझेले म्हणाले की अतिरिक्त लोकसंख्या व अपुरी साधने याचा समन्वय साधने गरजेचे आहे. लोकसंख्येचे नियंत्रण हे सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. संसाधनावरील पडलेला ताण हा कैक पटीने मोठा आहे. त्यामुळे त्याची पूर्तता करणे म्हणजे आर्थिक ताण मोठ्या प्रमाणावर पडतो. दिवसेंदिवस निसर्ग कमी कमी होत चाललेला आहे व त्याचा मानव प्राणी व इतर प्राणी यांच्यावर पडला आहे. असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बालाजी सुरवसे तर आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!