गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो:प्रा.वसीम सय्यद

गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो:प्रा.वसीम सय्यद

*कोकण Express*

*गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो:प्रा.वसीम सय्यद*

जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वाड़मय मंडळ, मराठी विभाग कडून व्यास पौर्णिमा उत्साहपूर्ण साजरी करण्यात आली.

गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे .वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात.

सृष्टीच्या सुरुवातीपासूनच, शैक्षणिक ज्ञान, अध्यात्म आणि साधनेचा विस्तार करणे आणि ते प्रत्येक मानवासाठी सुलभ व्हावे या उद्देशाने गुरु-शिष्य परंपरेचा जन्म झाला. जो शिष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो त्याला गुरु म्हणतात. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान देवाच्याही वरचे आहे. या दिवशी केवळ गुरूच नव्हे तर कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि त्यांना गुरू मानून त्यांचा आदर केला पाहिजे. गुरुंच्या सन्मानार्थ हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. म्हणून गुरु पौर्णिमेला, जगतगुरु वेद व्यास यांच्यासह लोक आपल्या गुरूंची सेवा आणि पूजा करतात, असे या दिवसाचे महात्म्य व्यक्त करत गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो असे प्रतिपादन ही प्रा.वसीम सय्यद यांनी केले.

समाधानकारक व सामर्थ्यवान जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे गुरू असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पुजन ने करण्यात आली. तत्पश्चात एस.वाय.बी.काॕम मधील विद्यार्थ्यांनीनी “गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे गीत सादर करून गुरू प्रती असणारा आपला आदर व्यक्त केला. त्याच प्रमाणे या कार्यक्रमास उपस्थित सर्व प्राध्यापकांना पुष्प व लेखणी देवून सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी भूषवले.

या कार्यक्रमात रश्मी मेस्री, श्रुती पाटणकर ,चेतन मांजरेकर ,पुजा पाटील, विनायक बंदरकर, प्रज्ञा पवार ,नौसीन पावसकर ,शुंभागी कुडाळकर,ऋता इतकरी, अदिती भालेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे, मराठी विभाग प्रमुख सहा.प्रा.रश्मी देसाई, सहा.प्रा.प्रकाश शिंदे, सहा.प्रा.डॉ.वंदना शिंदे-व्हटकर, सहा.प्रा.तानाजी गोदडे, सहा.प्रा.गजानन व्हंकळी, सहा.प्रा.शर्मिन काझी, सहा.प्रा.रूची तेली,सहा.प्रा.प्रज्योत नलावडे, सहा.प्रा.माधवी पांचाळ, सहा.प्रा.समरीन काझी, सहा.प्रा.अक्षता मोंडकर, ग्रंथपाल श्री.तन्मय कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी गुरुनाथ भोसले, अदिती भालेकर आदी विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख सहा.प्रा.रश्मी देसाई व आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी कु.गुरुनाथ भोसले यांनी केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.यश राऊत याने केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!