*कोकण Express*
*सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुंडलिक दळवी…*
*सावंतवाडी ःः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुंडलिक दळवी, उपाध्यक्षपदी जयप्रकाश नार्वेकर, अविनाश हिरोजी यांची तर सचिव पदी शिवाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. दरम्यान व्यायाम शाळा आणि होतकरू व्यायामपटूना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी श्री. दळवी यांनी दिले.

