*कोकण Express*
*शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सौजन्याने खांबाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व छत्रीचे वाटप*
*गेली 25 वर्षे सातत्याने राबविला जातोय उपक्रम*
*मुंबई पोलीस विभागातील निवृत्त ए.सी.पी. प्रभाकर लोके, सरपंच गौरी पवार यांच्या हस्ते केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य व छत्रीचे वाटप*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
खांबाळे गावातील प्रशालेतील विद्यार्थ्यांना मंगेश लोकेनी गेली 25 वर्षे स्व:खर्चाने शैक्षणिक साहित्याचे केलेले वाटप खरंच कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे सहकार्य करून त्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांनी यामधून आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत व या शाळेचे पालकांचे शिक्षकांचे नाव उज्वल करण्यासाठी कटीबद्ध व्हावे असे प्रतिपादन मुंबई पोलीस विभागातील निवृत्त अधिकारी ए.सी.पी. प्रभाकर लोके यांनी केले.
शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सौजन्याने केंद्रशाळा खांबाळे नं.१, वि. म. मोहितेवाडी, वि. म. धनगरवाडी शाळा या प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थीना मोफत शैक्षणिक साहित्याचे व छत्रीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रभाकर लोके मार्गदर्शनपर बोलत होते.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य, खांबाळे सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, केंद्रप्रमुख शिवाजी पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद लोके, माजी सरपंच विठोबा सुतार, ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता कदम, दर्शना मोरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मंगेश कांबळे, जेष्ठ ग्रामस्थ वासुदेव सावंत, सुनील गुरव, रामचंद्र पवार, रुपेश कांबळे, शिक्षक अस्मिता सुतार, श्रीम.वाघतकर मॅडम, श्रीम.बिचकुंडे मॅडम व सर्व पालक उपस्थित होते.