*कोकण Express*
*कवी प्रशांत चव्हाण यांच्या परिसर कवित्यांमधून निसर्गाचे मनोज्ञ दर्शन*
*ओसरगाव शाळेतील ‘परिसर कविता’ ग्रंथ भेट कार्यक्रमात विशाल कासले यांचे प्रतिपादन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
बालकवी प्रशांत चव्हाण हे अगदी हळुवारपणे आपल्या बालकविता लेखनातून निसर्ग वर्णनाचा मनोज्ञ असा वेध घेत निसर्गाचे दर्शन घडवितात. शहरी होत जाण्याच्या या काळात त्यांचे हे लेखन म्हणजे मानवी संवेदनशीलता जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे काम आहे.असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विशाल कासले यांनी तालुक्यातील ओसरगाव प्राथमिक शाळा 1 मध्ये आयोजित केलेल्या ग्रंथ भेट कार्यक्रमात केले.
जि. प. शाळा ओसरगाव नंबर 1 या शाळेमध्ये मुलांना लहानपणापासूनच साहित्य लेखनाची आवड निर्माण व्हावी यासाठी बालकवी प्रशांत चव्हाण यांचे ग्लोबल बुक हाऊस प्रकाशन मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेले ‘परिसर कविता’ हे पुस्तक शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि काही पालकांना भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी 2022 या सातवी वर्गाचा निरोप समारंभ मोठ्या उस्तहात संपन्न झाल. यावेळी श्री कासले यांनी इंग्लीश ग्रामर याबद्दलही मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी मुख्याध्यापक किशोर कदम, शिक्षिका शितल दळवी, राजश्री तांबे आदी उपस्थित मान्यवर होते.
किशोर कदम म्हणाले, बालकवी चव्हाण यांच्या परिसर कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे या संग्रहातील सर्वच कविता मुलांचं भावविश्व सहजगत्या फुलवणारी, मुलांना निखळ निर्मळ आनंद देणारी कविता आहे. बाल कविता ही मुलांना खाऊ इतकिच प्रिय असते. अशी कविता लिहिण्यासाठी कवीची संवेदनशीलता तितकीच बाल मनाची वेध घेणारी हवी. या पार्श्वभूमीवर बालमन समजून घेऊन कवी प्रशांत चव्हाण यांनी परिसर कवितांमधील लेखन केल आहे. हा कवितासंग्रह अतिशय चांगला आहे. या कविता संग्राम मधील कविता वाचनामुळे मुले परिसर वाचू शकतील आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नक्कीच फरक पडेल असा आशावाद वाटतो.
सदर कार्यक्रमात कामगिरी शिक्षिका शीतल दळवी यांचा सत्कार करण्यात आला.आभार राजेश्री तांबे यांनी मानले.