दोडामार्ग कळणे मार्गे मोठ्या प्रमाणात राजरोस प्रमाणे सुरू असणारी दारू वाहतुकीवर तत्काळ आळा घाला

दोडामार्ग कळणे मार्गे मोठ्या प्रमाणात राजरोस प्रमाणे सुरू असणारी दारू वाहतुकीवर तत्काळ आळा घाला

*कोकण Express*

*दोडामार्ग कळणे मार्गे मोठ्या प्रमाणात राजरोस प्रमाणे सुरू असणारी दारू वाहतुकीवर तत्काळ आळा घाला*

*अन्यथा झरीचा शुक्राचार्य कोण हे लवकरच पुरव्यासहीत उघड करू – मनसे कळणे विभाग अध्यक्ष श्री.अभय पांडुरंग देसाई*

दोडामार्ग तालुक्यातील अनेक ठिकाणी कळणे मार्गे, (गोवा मधील हासापूर ते कळणे ), तिलारी मार्गे, सासोली मार्गे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणत अवैध दारू वाहतूक असल्याचे वास्तव दिसून आले आहे. रात्रीच्या अंधारात गोव्यातून बनावट दारू महाराष्ट्रमध्ये वाहतूक होत असल्याचे दिसून आले. गोवा महाराष्ट्र दारूसाठा व वाहतूक कुठे आणि कोणाच्या माध्यमातून होते ?? त्यासाठी कोण कोण नेमलेले आहेत ह्याची सर्व माहिती आमच्याकडे पुरव्यासहित पोहचलेली आहे त्यामुळे लवकरच ते रंगेहाथ उघड करू असा इशारा मनसेचे कळणे विभाग अध्यक्ष अभय पांडुरंग देसाई यांनी दिला. अवैध्य दारूची वाहतूक ही पोलिसच्या आशिर्वादाने आणि पोलिस संरक्षणमध्ये केली जात असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे . हा रात्रीस खेळ अनेक ठिकाणी चालू आहे. हे सर्व गुपित समोर यायला हवा त्यासाठी मनसे पदाधिकारी स्वतः त्या ठिकाणी पहारा सुरू करणार आहेत आणि हासापूर – कळणे वेशी, तिलारी, सासोलि येथे होणारी अवैध दारू वाहतूक रंगे हाथ पकडुन दोडामार्ग पोलिस स्टेशनला आणि राज्य उत्पादन शुल्क विभागला पुरावे सहित देणार असल्याचं स्पष्ट केले आहे. तरुण पिढी जवळ पैसे अभावी अशा बनावट दारू विकत घेण्याचे प्रमाण वाढत आहे. तरुण पिढीमधील ही व्यसन वाढत आहे. त्यामुळे ह्या बनावट दारू प्रकरण वेळीच बंद व्हायला हवे. परंतु प्रशासन लक्ष देत नाही तरीही सदर प्रकरणाला प्रशासनाने वेळीच आळा न घातल्यास मनसे सरचिटणीस माजी आमदार परशूराम उपरकर यांच्या पुढाकारातून अवैध्य दारूची वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू असा इशारा मनसेचे कळणे विभाग अध्यक्ष अभय पांडुरंग देसाई यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!