कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक सागर खंडागळे यांची मालवणला बदली

कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक सागर खंडागळे यांची मालवणला बदली

*कोकण Express*

*कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक सागर खंडागळे यांची मालवणला बदली*

*प्रामाणिक, कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून खंडागळे यांची ओळख*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांची आज तडकाफडकी बदली झाली. त्याची ही बदली राजकीय हस्तक्षेपा मुळे झाली असावी अशी चर्चा आहे. सागर खंडागळे यांनी गेली अडीच वर्ष कणकवली पोलिस ठाण्यात यशस्वीरित्या काम केले. अनेक गंभीर प्रकरणे व निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यात सागर खंडागळे यांचा मोठा हात आहे.

सागर खंडागळे हे गेली अडीच वर्षे कणकवली पोलिस उपनिरीक्षक म्हणून उत्तम रित्या कार्यभार सांभाळत होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्ह्यांचाही उलगडा केला होता. गुन्ह्यांचा यशस्वी तपास करण्यात त्यांचा हातखंडा होता. अशा कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली होण्याने काहीशी नाराजी व्यक्त होत आहे.

खंडागळे यांचा सामाजिक कार्यात /कार्यक्रमांमध्ये ही सहभाग

कणकवली शहरातील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये कणकवली पोलिस उपनिरीक्षक सागर खंडागळे यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. अगदी मनमोकळेपणाने नागरिकांशी संवाद साधून योग्य प्रकारचे मार्गदर्शन करायचे.

पत्रकारांना असायचे मोलाचे सहकार्य

कणकवलीतील, पत्रकार आज नेहमीप्रमाणे पोलिस ठाण्यात गेले असता सागर खंडागळे यांच्या बदली आदेशाची माहिती मिळाली. यावेळी पत्रकारांनी सागर खंडागळे यांच्याशी संवाद साधला. संवाद दरम्यान माहिती देत असताना सागर खंडागळे काहीसे भावनिक झाले. मात्र कर्तव्यनिष्ठ अधिकारी ही ओळख त्यांनी कायम जपली यापुढेही जपतील हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!