*कोकण Express*
*जिल्हात चोरी सत्राची मालीका सुरूच*
*तळेरेतील दहा दुकाने व राहती घरे फोडून पाच लाखाच्यावर ऐवज लंपास*
*चोरटे सी सी टी व्हीकॅमेर्यात कैद,पोलीसांसमोर चोर पकडण्याचेआव्हान*
*कासार्डे : संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या, तळेरे या ठिकाणी सोमवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान तब्बल दहा दुकाने व राहती घरे फोडली असून ,अंदाजे पाच लाखाच्यावर रोख रक्कम व घरासमोर लावलेली मोटारसायकल असा अंदाजे सहा लाखांच्या आसपास ऐवज लंपास केला आहे. याची माहिती कणकवली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून त्याचा अधिक तपास करीत आहेत.
चोरांनी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांना टार्गेट केले असून वैभववाडी पाठोपाठ तळेरे येथे धाडसी चोरी करून ते पसार झाले आहेत .चोरट्यांनी तळेरे बाजारपेठेची पूर्ण माहीती मिळवली असल्याचे त्यांच्या एंकदर कृत्यावरून जाणवते.
*चोरांच्या रडारवर असलेली दुकाने*
नामदेव आळी मधील कोहिनूर बियरबार शाॅपी ,गॅलेक्सी मोबाईल शॉपी ,फोटो स्टुडिओ ,यामधील रोख रक्कम सुमारे १०,०००/—च्या वर असून आशापुरा स्वीट मार्ट ,सुहास पिसे यांचे राहते घर, समृद्धी पतंजली स्टोअर्स,ज्वेलर्सचे दुकान इ. चे शटर फोडून रोख रक्कम लंपास केली .तसेच पुढे ते मुख्य बाजारपेठेतील साई श्रद्धा स्टोअर्स ,कल्याणकर साडी सेंटर, त्याचबरोबर भुसारी दुकान फोडून, व्यापार्याला देण्यासाठी ठेवलेली सुमारे ४,५०,००० /—(साडेचार लाख)रुपये रोख रक्कम लंपास केली आहे.शिवाय महामार्गालगत असलेले दत्त मेडिकल स्टोअर्स ,शंकर गारमेंट या दुकानातील चिल्लर रक्कमही चोरट्यांनी सोडली नाही. त्याच्यापुढे जाऊन बंडवाडी मार्गावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहणारे प्राथमिक शिक्षक राजू बिराजदार .यांच्या खोलीसमोर लावलेली स्प्लेंडर मोटर सायकल चोरट्यांनी हातोहात लंपास केली आहे.
*चोरटे सी सी टी व्ही.मध्ये कैद झाले असून अत्यंत निर्ढावलेल्या स्तिथीत वावरताना दिसतात.त्यांच्या चेहर्यावर कुठेही भितीची छटा जाणवत नाही .एंकदरीत त्याची मोठी टोळी असावी*.
*बाॅक्स*
[ तसे पाहता तळेरे बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत त्याचा वापर कोरोना कालावधी मध्ये गर्दी पांगवण्यासाठी केला जात होता. त्याच धर्तीवर सी सी टी व्ही आॅपरेटरने चोरांचे दृश्य पाहताच स्पीकर वरती चोर आले असे अनाउन्समेंट केली असती तर पुढील अनर्थ टळला असता असे व्यापारी वर्गातून बोलले जाते.]
तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा व्यापारी संघटनेचे सचिव राजू जठार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मंगळवारच्या बाजारपेठेमध्ये तळेरे येथे लोकांची गर्दी पाहता किमान दोन पोलीस शिपाई या ठिकाणी तैनात करावे अशी मागणी केली असता पोलिस अधिकाऱ्यांनी तत्वतः मान्य केल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली व स्थानीय व्यापाऱ्यांना धीरही दिला तसेच कणकवली पोलिसांनाही माहिती मिळताच ते आपल्या श्वान पथकासह फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. कणकवली चे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर ,ए पीआय खंडागळे ,पोलीस हवालदार वंजारे ,पोलीस नाईक कदम, एल आय ए यांची पूर्ण टीम .पुढील अधिक तपास करीत आहेत.

