*कोकण Express*
*मनसे लॉटरी सेना अध्यक्ष श्री गणेश कदम साहेब,निलेश मेस्त्री यांच्या सौजन्याने आज हनुमान जयंती निमित्त कोंडये, तेलीवाडी येथे सोलर लाईटचे लोकार्पण..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सन्मा.राजसाहेब ठाकरे व युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ,सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, चंद्रकांत वंदे,दया मेस्त्री, दत्ताराम बीडवडकर, नितिन पवार, सूर्यकांत मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसे लॉटरी सेना अध्यक्ष श्री गणेश कदम साहेब यांच्या सौजन्याने निलेश मेस्त्री यांनी आज हनुमान जयंती निमित्त कोंडये, तेलीवाडी येथे सोलर लाईटचे लोकार्पण केले. तेव्हा ग्रामस्थ,पदाधिकारी, कार्यक्रमास उपस्थित होते.या विजदरवाढ व लोडशेडिंगमुळे त्रस्त जनतेस गणेश कदम यांच्या सोलर लाईट उपक्रमाचा नक्कीच फायदा होत आहे असे उपस्थित लोकांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य पक्षाच्या नेत्यांनी पण असा उपक्रम राबवावा असे सिंधुदुर्ग वासीय अपेक्षा करित आहेत. यावेळी उपस्थित लोकांनी राजसाहेब ठाकरे, गणेश कदम व नीलेश मेस्त्री यांचे आभार मानले व येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकित सदैव लोकसेवेसाठी तत्पर निलेश मेस्त्री यांनाच जिंकून देणार असे सांगितले.

