गवळी तिठा येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या भगव्या स्तंभाचे आज लोकार्पण

गवळी तिठा येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या भगव्या स्तंभाचे आज लोकार्पण

*कोकण Express*

*गवळी तिठा येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या भगव्या स्तंभाचे आज लोकार्पण…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने गवळी तिठा परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या भगव्या स्तंभाचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना श्री. साळगावकर म्हणाले, ४० वर्षांपूर्वी या स्तंभाची स्थापना करण्यात आली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात “तो” जीर्ण झाला होता. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या पुढाकाराने या स्तंभाचे काही दिवसांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. त्याचा नव्याने लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरसकर, दिलीप पवार, सचिव दीपक सावंत, सहसचिव महादेव राऊळ, पत्रकार सिताराम गावडे, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, दीपाली भालेकर, दिलीप भालेकर, संजय पेडणेकर, संजू शिरोडकर, तुषार वेंगुर्लेकर, विशाल सावंत, अमित लाखे, जय भालेकर, ओंकार भालेकर, प्रदीप नाईक, महेश नार्वेकर, सुनील साळगावकर, सचिन बागवे, संजय साळगावकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून रवी जाधव यांची नियुक्ती श्री. साळगावकर यांनी जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!