ओसरगाव येथील अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

ओसरगाव येथील अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

*कोकण Express*

*ओसरगाव येथील अपघातात युवकाचा जागीच मृत्यू….!*

*दुचाकीस्वारास चारचाकीची मागून धडक…!*

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मित्र मंडळींनी घेतली धाव…!

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई – गोवा महामार्गावर ओसरगाव येथे कणकवली दिशेला येणाऱ्या दुचाकीला अज्ञात चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. यावेळी त्या दुचाकीवरील प्रसन्ना प्रकाश मलूष्टे. (42) रा. मारुतीआळी, कणकवली आणि सोबत असलेला अभिजीत अशोक आचरेकर (43)रा.मारुती आळी जखमी झाले. मात्र, या अपघातात प्रसन्ना याला गंभीर दुखापत झलयाने त्याचा मृत्यु झाला तर अभिजीत हा सुदैवाने बचावला. तसेच सदर चारचाकी गाडी धडक देवून जात असताना पाठलाग करत ओसरगावचे सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी अडवले. दरम्यान, अपघाता नंतर लागताच जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्नालायात दाखल करण्यात आले. तर सदर घटनेची माहिती कळताच नगराध्यक्ष समीर नलावडे,नगरसेवक विराज भोसले,संजय कामतेकर,अण्णा कोदे,शिशिर परुळेकर,कन्हैया पारकर,बाबू गायकवाड,राजू गवाणकर,बंटी तहसीलदार, सुशील आळवे,संजय मालंडकर, सुशील पारकर,निखिल आचरेकर,अमोल पराष्ट्येकर यांच्यासह मित्र परिवाराने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, प्रसन्ना याच्या पश्चात आई, वडील व विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!