*कोकण Express*
*सोनगेवाडीतील महिलांकरता सुजित जाधव यांच्या माध्यमातून अनोखा उपक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पहाटेपासून ते अगदी रात्रीपर्यंत घराच्या रहाटगाडग्यात व्यस्त असणाऱ्या महिलांना एक स्वच्छंदी उनाड दिवस अनुभवायला मिळावा आणि त्यांनाही थोडा विसावा मिळावा या भावनेतून शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी स्वखर्चाने कणकवली सोनगेवाडीतील महिलांना आंगणेवाडी भराडीदेवी दर्शन आणि मालवण पर्यटनाची संधी रविवारी 27 मार्च रोजी उपलब्ध करून दिली. याचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक तथा नगरपंचायत विरोधी गटनेता सुशांत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, अपूर्वा जाधव, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, विलास गुडेकर, मधुकर शिरकर, सी.आर.चव्हाण आदींसह सोनगेवाडीतील नागरिक उपस्थित होते. नेहमीच्या कामाच्या व्यापातून मोकळा श्वास घेत महिलांना भराडीदेवी दर्शनासह मालवण शहर व परिसर पर्यटनाची संधी यानिमित्ताने मिळाली. सोनगेवाडी या भागात नोकरदार, कामगार, व्यापारी, मजूर तसेच अन्य स्थानिक व्यावसायिक राहतात. आज देवदर्शन सह पर्यटन निमित्ताने बाहेर पडलेल्या सोनगेवाडीतील 30 महिलाना प्रथमच एकत्रित प्रवासाची संधी यानिमित्ताने मिळाली. सर्व महिलांना एकत्र आणत सुजित जाधव व अपूर्वा जाधव यांनी सोनगेवाडीतील 30 महिलांसाठी येण्याजण्याचा प्रवास तसेच भोजन व्यवस्था सुजित जाधव यांनी उपलब्ध करून दिली आहे. रोजच्या धावपळीच्या व्यापातून एक दिवस मोकळा मिळाला. भराडीदेच्या दर्शनासह मालवण पर्यटनाची एकत्रित संधी जाधव दाम्पत्यामुळे मिळाल्याची भावना उपस्थित महिलांकडून व्यक्त होत होत्या. सुजित जाधव आणि अपूर्वा जाधव या दाम्पत्याच्या या उपक्रमाबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले.