*कोकण Express*
*पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे सिंधुदुर्गात भव्य होणार स्वागत…*
*युवासैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ;सुशांत नाईक…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे उद्या २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी कणकवली विधानसभा मतदार संघ युवासेनेतर्फे त्यांचे भव्य स्वागत होणार असल्याची माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची युवा सेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता तारामुंबरी पुलाजवळ आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने युवा सैनिकांना येण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. तरी कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व युवासैनिक व युवासेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सुशांत नाईक यांनी केले आहे.