तुतारी एक्स्प्रेसला नांदगाव येथे पूर्वी प्रमाणे थांबा द्या. रिक्षा चालक संघटनेची मागणी

तुतारी एक्स्प्रेसला नांदगाव येथे पूर्वी प्रमाणे थांबा द्या. रिक्षा चालक संघटनेची मागणी

*कोकण  Express*

*तुतारी एक्स्प्रेसला नांदगाव येथे पूर्वी प्रमाणे थांबा द्या. रिक्षा चालक संघटनेची मागणी*

*माजी आमदार प्रमोद जठार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन*

*नांदगाव  ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन येथे तुतारी एक्स्प्रेसला पूर्वी प्रमाणे थांबा देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे रिक्षा चालक संघटनेने आज माजी आमदार प्रमोद जठार यांच्या जवळ नांदगाव येथे भेट घेत केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले असल्याचे संबंधित रिक्षा चालक संघटनेने सांगितले आहे. याबाबत आम्हाला लेखी पत्राद्वारे त्यांचे पाठपुरावा सुरू असल्याचे कळवले आहे. यावेळी रविंद्र ऊर्फ बाबू घाडीगांवकर, अमृता अमृत चौगुले, सदाशिव सावंत उर्फ बाबू गांधी, अनिल सुतार, प्रदीप घावरे , विनोद बंदरवर ,रविंद्र सावंत, मुरलीधर राणे, देवेंद्र पावसकर, प्रदीप राणे , आदी वाघेरी ,पियाळी ,मठखुर्द येथील रिक्षा चालक संघटनेने पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!