राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरें दिनांक २८ रोजी सिंधुदुर्गात येत आहेत. त्यांच्या हस्ते वेंगुर्लेतील विविध विकास कामांच्या उद्घाटना सोबत रत्नसिंधू या योजनेचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे, असे मत आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी तब्बल ७८ कोटींची कामे दिली आहे. यात रस्ते पूलांचा समावेश आहे. तर सावंतवाडी शहराला ८ कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच सह्याद्री मार्गाला राज्य मार्गाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असेही ते म्हणाले. ते आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ,माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,शहर प्रमुख बाबु कुडतरकर,माजी नगरसेविका अनारोजीन लोबो,नारायण राणे,आदी उपस्थित होते.