*कोकण Express*
*वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या निबंध स्पर्धेत गवाणे शाळेचा प्रदीप सावंत दुसरा*
*कासार्डे ः संजय भोसले*
विद्यार्थ्थांनी अवांतर वाचन करुन आपले ज्ञान वाढवावे व वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या बुद्धीची चमक दाखवावी , पार्थ सावंंत याने मिळवलेल्या यशाबद्दल मला अभिमान तसेच आनंंद वाटतोअसे मत गवाणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक तळेकर यांनी केले.
वेंगुर्ले तालुका पञकार समितीच्यावतीने ” युवा पिढीसमोरील आव्हाने आणि संधी ” या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धां आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धत पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर गवाणे या प्रशालेचा नववीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी कुमार पार्थ प्रदिप सावंंत याने द्वीतीय क्रमांक पटकावला त्याच्या या यशाबद्दल शाळेमध्ये पार्थचा सत्कार करण्यात आला. पार्थने मिळविलेल्या यशाने शाळेच्या नावलौकिक वाढविल्याबद्दल मुख्याध्यापक ए. एच्. मुल्ला सर यांनी त्याचे विशेष कौतुक करुन आनंद व्यक्त केला.
पार्थच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष तळेकर यांच्या हस्ते इयत्ता दहावीचे विद्यार्थी , शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पुष्पगुच्छ व रोख रक्कमेची बक्षिसे देऊन पार्थ सावंंत याचा सत्कार करण्यात आला. पार्थने शाळेतील गुरुजन आणि विद्यार्थ्थांनी केलेल्या या सहृदयी सत्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

