*कोकण Express*
*प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर याना PH.Dगाईड म्हणून मान्यता*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली कॉलेज कणकवली चे ग्रामीण विकास विषय शिक्षक प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर यांना मुंबई विद्यापीठ अंतर्गत ग्रामीण विकास विषयाचा PH.D गाईड मान्यता मिळाली आहे.
यावेळी माहिती देताना प्रा.मुंबरकर म्हणाले की यापुढे रिटायर्ड होईपर्यंत ग्रामीण विकास विषयात जे विद्यार्थी Ph. D करणार आहेत त्यांना मार्गदर्शनाचे काम करणार आहे.
ग्रामीण विकास विषय हा प्रा.राजेंद्र मुंबरकर यांचा अत्यंत अनुभवी विषय आहे. ग्रामीण विकास शिकवताना विद्यार्थ्यांना समाजात कशा प्रकारे राहायचे ,वागायचे आणि आजच्या समाजाला ग्रामीण विकासाबरोबर काय महत्वाचे आहे या बाबत वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते आणि याच फायदा विद्यार्थ्यांना १००% कसा होईल आणि विद्यार्थी याच विचारांनी स्वतःच्या पायावर कसा उभा राहील हे विशेष प्रयत्न प्रा.मुंबरकर यांचे असतात .त्यामुळे नक्कीच या Ph.D गाईड मान्यतेचा विद्यार्थी वर्गाला तसेच ग्रामीण विकास विषयात Ph.D करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

