कुडाळच्या जि.प.घोडगे बाजार शाळेत महिला दिन उत्साहात साजरा

कुडाळच्या जि.प.घोडगे बाजार शाळेत महिला दिन उत्साहात साजरा

*कोकण Express*

*कुडाळच्या जि.प.घोडगे बाजार शाळेत महिला दिन उत्साहात साजरा*

*कासार्डे  ः  संजय भोसले*

कुडाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगे बाजार येथे जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून घोटगे गावचे सरपंच अमोल विष्णू तेली व प्राथमिक शिक्षक समिती राज्य सल्लागार डी .बी. कदम उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती रेवा राजेश सदडेकर यांनी भूषविले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शलाका राणे यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना आपले कर्तव्य व जबाबदारी यांची माहिती दिली उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर त्यानिमित्त विद्यालयात महिलांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते तसेच महिलांसाठी फनी गेम्स मध्ये संगीत खुर्ची चमचा लिंबू यासारखे खेळ घेण्यात आले बहुसंख्य महिलांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला स्पर्धेत भाग घेतलेल्या यशस्वी स्पर्धकांचे शाळेच्या वतीने स्पर्धकांना पुष्पगुच्छ व बक्षिसाच्या रूपात भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे ही या वेळी शाळेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी व्यासपीठावर घोटगे गावचे सरपंच श्री अमोल तेली गावच्या ग्रामपंचायत सदस्य श्रीमती मान्येकर घोटगे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुहास सावंत सर व शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ शिक्षक पालक संघ संघाचे सदस्य ग्रामस्थ व महिला व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कायॆक्रमासाठी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य आदरणीय लॉरेन्स मान्येकर साहेब यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अंजली चव्हाण यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शलाका राणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!