*कोकण Express*
*सिनेमागृहात सापाने केला महिलेला दंश!*
*सर्पदंश घटनेमुळे उडाली एकच खळबळ!*
*तर महिलेला उपचारासाठी केले रुग्नालायत दाखल!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीतील सिनेमा थेटर मधे रविवारी (ता.६) रा. ९ वा. पावनखिंड सिनेमाचा शो चालू असताना सिनेमा पाहत असलेल्या एका महिलेला अचनाक सापाने दंश केल्याची घटना आज रात्रि १०.४५ वा. सुमारास घडली.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध मराठी पावनखिंड सिनेमा पाहत असलेल्या एका महिलेल्या अचानक कोणी तरी दंश केल्याचे जानवले असता, आजु – बाजूला पाहिले असता एक साप दिसून आला. त्यानंतर एकच खळबळ त्या सिनेमा गृहात् उड़ाली. लागताच चित्रपट तेथेच थांबवण्यात आला. मात्र, नक्की साप कोणता होता? हे समजू शकले नाही, तरी खबरदारी म्हणून त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्या सापाचा देखील शोध त्या सिनेमा गृहात् घेतला जात आहे.

