त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

*कोकण  Express*

*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी व्ही रमण यांनी २८फेब्रुवारी 1958 रोजी प्रकाशाचे विकरण हा महत्त्वाचा शोध लावला.त्यामुळे २८फेब्रुवारी हा दिवस संपुर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता. मालवण या प्रशालेत विविध उपक्रमातून हा दिवस साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे, विज्ञान शिक्षक श्रीमती खोत एस एस, विज्ञान शिक्षक श्री. व्ही डी काणेकर, श्री. एस के पाचंगे, श्रीम. पी व्ही. गांवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनाही यावेळी मनोगत व्यक्त केले. विज्ञान शिक्षक श्री. काणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित विविध स्वकल्पनेतुन प्रायोगाचे सादरीकरण केले. या विज्ञान प्रदर्शनात मोठ्या गटात कु. राज उत्तम गांवकर, कु. अथर्व अनिल गांवकर यांनी प्रथम क्रमांक, कु. प्राची दिनेश लाड, कु. आरती शंकर गांवकर यांनी द्वितीय क्रमांक, कु. साक्षी संतोष गांवकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर लहान गटात कु. सोहम विजय गांवकर व कु. कौशल दिनेश गांवकर प्रथम क्रमांक, कु. मयूर वासुदेव घाडीगांवकर व कु. साहिल रामचंद्र घाडीगांवकर द्वितीय क्रमांक, कु. शिवम संतोष भोगटे तृतीय क्रमांक, उत्तेजनार्थ कु. आदित्य कृष्णा घाडीगांवकर असे यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!