गोट्या सावंत यांना सशर्त जामीन मंजूर

गोट्या सावंत यांना सशर्त जामीन मंजूर

*कोकण  Express*

*गोट्या सावंत यांना सशर्त जामीन मंजूर*

*गोट्या सावंत यांच्या वतीने ऍड.राजेंद्र रावराणे यांनी केला युक्तिवाद*

दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात येण्यास बंदी*

*सिंधुदुर्ग :*

शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणी नंतर मंगळवारी गोट्या सावंत यांना जामीन मंजूर करण्यात आला. गोट्या सावंत यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. मात्र जामीन मंजूर करत असताना गोट्या सावंत यांना दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात बंदी, दर सोमवारी ओरोस पोलीस स्टेशनला हजेरी लावणे, पोलीस तपासात सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, आदि अटी घालण्यात आल्या आहेत. गोट्या सावंत यांच्या वतीने ऍड.राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला. तर सरकार पक्षाच्यावतीने ऍड.प्रदीप घरत यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!