सामाजिक  बांधिलकीतून शिवरायांना मानवंदनाा

सामाजिक  बांधिलकीतून शिवरायांना मानवंदनाा

*कोकण Express*

*सामाजिक  बांधिलकीतून शिवरायांना मानवंदनाा*

*वृद्धाश्रम, कातकरी बांधवांना मदत करून शिवजयंती साजरी ; शिवजयंती उत्सव समितीचा उपक्रम*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे कोणताही गाजावाजा न करता वृद्धाश्रम आणि कातकरी बांधवांना जीवनावश्यक साहित्य देऊन, सामाजिक बांधिलकी बाळगून शिवजयंती करण्यात आली. समितीने समाजासमोर आदर्श निर्माण केला असून या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त प्रतिवर्षी दुचाकी रॅलीचे आयोजन केले जाते. यावर्षी शासनाने रॅलीला बंदी घातल्यामुळे सामाजिक उपक्रमांद्वारे शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचे ठरवले. समितीचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे कोकणप्रांत सचिव प्रताप भोसले यांच्यासह कान्हा मालंडकर, संदीप चव्हाण, दिनेश सावंत, अनुप वारंग आदींच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी उपक्रम यशस्वी केले.
कातकरी बांधवांना खुर्च्या , ब्लँकेटचेे वाटप.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!