माणुसकीची भिंत उपक्रमांतर्गत जमा झालेले कपडे “सविताश्रमाला” सुपूर्द

*कोकण Express*

*माणुसकीची भिंत उपक्रमांतर्गत जमा झालेले कपडे “सविताश्रमाला” सुपूर्द…*

*सावंतवाडी पालिकेच्या उपक्रम; जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकरांच्या हस्ते वितरण…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येथील पालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत जमा झालेले कपडे आज कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील सविताश्रमाला देण्यात आले.ही मदत नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत जिल्हा बँक संचालक अतुल कासेकर यांच्या हस्ते आश्रमाचे व्यवस्थापक आशिष कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर,दिलीप भालेकर,बंटी राजपुरोहित,रसिका नाडकरणी,रवींद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते. दरम्यान गोळा झालेल्या वस्तू सविताश्रमापर्यंत पोचविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधून पालिकेचे सफाई कर्मचारी गणेश खोरागडे यांनी विशेष मेहनत घेतली.

दोन महिन्यापूर्वी पालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दरम्यान या उपक्रमात जीवनावश्यक वस्तू तसेच पुनर वापरात येणारे कपडे भांडी व वाचनीय पुस्तके गरजूंना मदत म्हणून गोळा केली जात आहेत. व गरजवंतांना त्याचे वितरण करण्यात येत आहे. याच माध्यमातून आज हा उपक्रम राबविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!