तळेरे पूलाखाली पुरातन मूर्तीचा विक्री व्यवहार पाडला हाणून

तळेरे पूलाखाली पुरातन मूर्तीचा विक्री व्यवहार पाडला हाणून

*कोकण Express*

*तळेरे पूलाखाली पुरातन मूर्तीचा विक्री व्यवहार पाडला हाणून…!*

*स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाची कारवाई…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तळेरे पूलाखाली एका पुरातन मूर्तीची विक्री करण्याचा व्यवहार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हाणून पाडला. त्याच्याकडून ती मूर्ती ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. सदरची मूर्ती पुरातन आहे की कशी? याबाबतची तपासणी करण्यासाठी मूर्ती रत्नागिरी येथे पुरातन विभागाच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. ज्याच्याकडे ही मूर्ती सापडली त्याने ही मूर्ती आपणास घराच्या परिसरात खोदाई करताना काही वर्षांपूर्वी सापडल्याचे पोलिसांना सांगितले.

बुधवारी सायंकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली. एलसीबीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. घाग व अन्य कर्मचार्‍यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळेरे येथे ही मूर्ती एकाकडून ताब्यात घेतली. मूर्ती धातूची आहे मात्र ती पंचधातूची आहे की पुरातन आहे? हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. पुरातन वस्तूंच्या विक्री व खरेदीबाबतच्या कायद्यानुसार पुरातन मूर्ती बेकायदेशीररित्या कोणी विकत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. एलसीबीने हा तपास पुढील तपासासाठी कणकवली पोलिसांकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी आणखी काहीजणांचा सहभाग आहे. याप्रकरणी एकास चौकशीअंती नोटीस देऊन सोडल्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री.देठे यांनी सांगितले. कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक श्री.देठे याप्रकरणी तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!