गुरुकुल करिअर ॲकॅडमी, ओरोसच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन

गुरुकुल करिअर ॲकॅडमी, ओरोसच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन

*कोकण Express*

*गुरुकुल करिअर ॲकॅडमी, ओरोसच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन*

*कासार्डे ः संजय भोसले*

ओरोस येथील गुरुकुल करियर अकॅडमीच्या वतीने 19 फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचा प्रारंभ शिव ज्योतीच्या आगमनाने होणार आहे. पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांना अभिवादन करण्यात येणार आहे.
यानंतर अकॅडमीच्या मुला-मुलींच्या वतीने लेझीम, जिम्नॅस्टिक योगासने ,रोप मल्लखांब आणि शिवकालीन मर्दानी युद्धकला प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. त्यासोबत पोवाडा ,डान्स , नाटक आणि विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमास रसिकांनी आणि शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुकुल करियर अकॅडमी ओरोसच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!