*कोकण Express*
*दोडामार्ग नगरपंचायतच्या अपक्ष नगरसेविका संध्या प्रसादी यांचा भाजपात प्रवेश*
*भाजपा नेते,केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत झाला प्रवेश*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
दोडामार्ग च्या अपक्ष नगरसेवक संध्या राजेश प्रसादी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत ओमगणेश निवासस्थांनी हा प्रवेश करण्यात आला.
दोडामार्ग नगरपंचायत मध्ये भाजपाचे १३ सदस्य निवडणू आले आहेत.संध्या प्रसादी या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत त्यांनी आज भाजपा मध्ये प्रवेश केल्याने ही संख्या १४ वर पोचली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संध्या प्रसादी यांना भाजपात प्रवेश झाला त्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजन म्हापसेकर,भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे,माजी जिल्हापरिषद सभापती एकनाथ नाडकर्णी,अमित प्रसादी आदी उपस्थित होते.

