*कोकण Express*
*ज्येष्ठ दशावतारी कलावंत सुधीर कलिंगण यांचे निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ दशावतारी कलावंत लोकराजा सुधीर कलीगंण यांचे अल्पशा आजाराने गोवा येथील व्हिजन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सुधीर कलिंगण यांनी
दशावतारी कला ही साता समुद्रापार पोहचविण्यात मोठा वाटा उचलला होता. दशवतारातील लोकराजा म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने दशावतारी कलेचे मोठे नुकसान झाले आहे.

