महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मधील मानांकित बालकलाकारांचा केला सत्कार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मधील मानांकित बालकलाकारांचा केला सत्कार

*कोकण  Express*

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मधील मानांकित बालकलाकारांचा केला सत्कार*

*पिंगुळी शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शाल,श्रीफळ व श्री देव रवळनाथ प्रतिमा भेट देऊन मनसे पदाधिकाऱ्यांकडून कौतुक*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “स्नेहांश इंटरटेनमेंट आणि चिमणी पाखरं डान्स अकॅडमी” यांच्या संयुक्त निर्मितीमधून साकारलेले “झुलबी, माली, टाईम प्लिज यासारख्या लघुचित्रपटांमधून मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल स्पर्धेत बहुमान मिळवणाऱ्या कु दिक्षा नाईक,कु साहिल महेंद्र सातार्डेकर,कु दिव्या धामणेकर व कु वेदांत वेंगुर्लेकर या बालकलाकारांचा मनसेच्या वतीने शाल, श्रीफळ व श्री देव रवळनाथ प्रतिमा देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. स्नेहांश एन्टरटेन्मेंट च्या झुलबी शॉर्टफिल्म मधील कु.दिक्षा नाईक हिला सलग दोन वेळा इंटरनॅशनल लेव्हल वर बेस्ट एक्टरेस चा बहुमान मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये तिने दुसऱ्यांदा बेस्ट एक्टरेस चा ‘किताब पटकावला आहे तर “माली” या शॉर्ट फिल्मला देखील सर्वोत्कृष्ट मालवणी शॉर्ट फिल्म अवॉर्ड मिळाला आहे. कु साईल सातार्डेकर याला उत्कृष्ट सहाय्यक बालकलाकार हा अवॉर्ड मिळाला आहे.

जिल्हावासियांची मान अभिमानाने उंचावणारी हि गोष्ट असून या बालकलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. पिंगुळी धुरीटेंबनगर येथे आयोजित या कार्यक्रमात पुणे येथे पार पडलेल्या अडथळा शर्यत स्पर्धेत गोल्ड मेडल पटकवणाऱ्या सौ अनुष्का गावडे यांचा देखील सन्मान आला.यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी, मनसे उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष गुरू मर्गज,विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर, शाखाध्यक्ष वैभव धुरी,तुषार धुरी व पिंगुळी ग्रामपंचायत सदस्या उदया धुरी व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन दिपक गावडे यांनी केले तर आभार वैभव धुरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!