*कोकण Express*
*आम.नितेश राणे यांची बीएमसी निवडणुकीसाठी भाजपच्या प्रमुख समिती वर निवड…!*
*जिल्हा बँक, नगरपंचायतीच्या निवडणुकीतील कामगिरीमुळे सोपवली नवी जबाबदारी…!*
*निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या आम. नितेश राणे यांची घेतली भाजपने दखल…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या आमदार नितेश राणे यांच्यावर मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मुंबई भाजपाने महत्वाची जबाबदारी दिली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने स्थापन केलेल्या निवडणूक संचालन समिती वर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार असून, आम.राहूल नार्वेकर आम.कालिदास कोळंबकर, प्रकाश महेता असे जेष्ठ आणि अनुभवी नेत्यांची ही प्रमुख समिती आहे. आमदार नितेश राणे यांची निवडणूक विजयाची रणनीती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुका मधून आजपर्यंत मिळविलेला विजय,आणि शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस अशा महाविकास आघाडी च्या ताब्यात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भारतीय जनता पार्टीची एकहाती मिळविलेली सत्ता,नगरपंचायत निवडणुकीत महाविका आघाडीला दिलेली टक्कर आणि मिळविलेल्या विजय यामुळे आमदार नितेश राणे यांची मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी महत्वपूर्ण समितीवर निवड करण्यात आली आहे.

