गोव्याला निघालेले ३७ प्रवासी साखरझोपेत असतानाच बसने घेतला पेट; चालकाने बस थांबवली अन् एकच धावपळ

गोव्याला निघालेले ३७ प्रवासी साखरझोपेत असतानाच बसने घेतला पेट; चालकाने बस थांबवली अन् एकच धावपळ

*कोकण Express*

*गोव्याला निघालेले ३७ प्रवासी साखरझोपेत असतानाच बसने घेतला पेट; चालकाने बस थांबवली अन् एकच धावपळ*

*पहाटेची घटना ; सर्व प्रवासी सुखरूप..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कोल्हापूर ते गोव्याकडे जाणाऱ्या मनीष ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने अचानक पेट घेत जळाल्याची घटना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वैभववाडी करूळ घाटात एडगांव घाडीवाडी नजीक घडली आहे.

ट्रॅव्हल्समधील ३७ प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच सर्व प्रवाशांना बसबाहेर उतरून सुरक्षित स्थळी नेले.

मनीष ट्रॅव्हल्स (नं. जीए ०३ /डब्लू २५१८) ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजिक बस आली असता बसने अचानक पेट घेतला. चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवली. दरम्यान बसमधील प्रवासी खाली उतरले. बसमधून धुराचे लोळ येऊ लागले बसने अधिकच पेट घेतला.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांची विचारपूस केली. दरम्यान महामार्ग विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही तासात कुडाळ येथील अग्निशमन बंब दाखल झाला. आग विझवण्यात आली. या घटनेनंतर एडगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही तासांनी वाहने मार्गस्थ करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!