*कोकण Express*
*वायरमन रविकांत सातवसे यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार…!*
*विजवीतरण मध्ये 32 वर्षे दिली सेवा ; सेवानिवृत्तीपर केला सन्मान…!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
विजवीतरणचे कर्मचारी म्हणून 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झालेले रविकांत सातवसे यांचा आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण होता. ज्यांनी आयुष्यातील बत्तीस वर्ष उत्तम प्रकारे सेवा दिली, त्यातील वीस वर्ष कणकवली मध्ये यशस्वी पने काम केले. तर दापोली हर्णे साकेडी, सावंतवाडी, कणकवली आदी गावात सेवा देवून ते मालवण तालुक्यात चौके येथे सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,
नगरसेविका मेघा सावंत, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, बाबू गायकवाड, सुशील पारकर, संदीप वालावलकर, महेश सावंत, दिनेश मांडवकर, सचिन नलावडे, सुभाष पालव, शांती आळवे आदी उपस्थित होते.

