*कोकण Express*
*जिल्हा न्यायालयाबाहेर आम. नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली..*
*माजी खा. निलेश राणे आक्रमक…*
*सिंधुदुर्ग*
आ. नितेश राणे यांनी गाडी पोलिसांनी अडविली आहे. न्यायालयाने नियमित जामीन अर्ज फेटाळल्या नंतर ते जात असताना पोलिसांनी त्यांच्या समोर आपल्या गाड्या लावल्या आहेत. यामुळे वातावरण तंग झाले असून माजी खा. निलेश राणे आक्रमक बनले आहेत. थांबविण्याचे आदेश दाखवा अशी त्यांनी मागणी केली आहे. भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. त्यामुळे काही काळ जिल्हा न्यायालयासमोर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

