*कोकण Express*
*नितेश राणेंच्या पीए ला 4 दिवसाची पोलीस कोठडी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संतोष परब हल्ल्यातील आरोपी असलेले आ.नितेश राणेंचे पीए राकेश परब यांना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राकेश परब यांना 31 जानेवारी रोजी कणकवली पोलिसांनी सायंकाळी अटक केली होती.आज सकाळीच परब याना कोर्टासमोर हजर करण्यात आले.न्यायालयाने राकेश परब याना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

