जिल्ह्यात ज्ञानमंदिरे सुरू झाली असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद

जिल्ह्यात ज्ञानमंदिरे सुरू झाली असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद

*कोकण Express*

*जिल्ह्यात ज्ञानमंदिरे सुरू झाली असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद*

*पहिल्या दिवशी १७११पैकी १६६९ शाळा सुरू*

*शिक्षण सभापती अनिशा दळवी यांची माहिती*

*सिंधुदुर्गनगरी*

जिल्ह्यात सोमवारपासून अखेर ज्ञानमंदिरे सुरू झाली असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या वर्गात १ लाख ११ हजार ४३५ विद्यार्थी असून शाळेच्या पहिल्याच दिवशी १ लाख ९ हजार २१६ मुलानी हजेरी लावल्याने पहिल्या दिवशी १७११पैकी १६६९ शाळा सुरू झाल्याची माहिती शिक्षण सभापती अनिशा दळवी यांनी सांगितले.

पहिली ते बारावी पर्यंत च्या शाळा २४ जानेवारी पासून सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र याबाबत चे पूर्ण अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे काेराेना बाधित आढळून आले होते. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत चा निर्णय २९ जानेवारी ला ते कामावर हजर झाल्यानंतर घेण्यात आला. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारपासून ज्ञानमंदिरे सुरू करण्यात असून पहिल्याच दिवशी १ लाख ९ हजार २१६ मुलानी हजेरी लावली असल्याची माहिती शिक्षण सभापती अनिशा दळवी यांनी सांगितले

जिल्हा परिषदेच्या १,७११ शाळांपैकी २२ शाळा बंद –

जिल्ह्यात पहिली ते बारावी अशा मिळून १ हजार ७११ शाळा आहेत. काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आल्याने तसेच काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आरटीपीसीआर अहवाल येण्यास विलंब झाल्याने २२ शाळा आज सुरू करण्यात आल्या नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!