*कोकण Express*
*खारेपाटण व्यापारी असोसिएशनचा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
प्रतिवर्षाप्रमाणे खारेपाटण व्यापारी असोसिएशन चा वार्षिक स्नेह मेळावा दिनांक 26 जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. या स्नेह मेळाव्याला जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री प्रसाद पारकर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री नितीन वाळके, जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष श्री महेश नार्वेकर, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री दीपक बेलवलकर, तसेच जिल्हा व्यापारी संघाचे कोषाध्यक्ष श्री अरविंद नेवाळकर, श्री राजन पारकर, श्री मधुकर नलावडे, श्री निवृत्ती धडाम, श्री गाड, हे प्रमुख मान्यवर लाभले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री प्रसाद पारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री वीरेंद्र चिके यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
व्यापाऱ्यांनी व्यापार्यांच्या हितासाठी व व्यापाराच्या उन्नतीसाठी स्थापन केलेली ही व्यापारी संघटना. या व्यापारी संघटनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या विविध व्यापाराविषयी च्या सोयीसुविधा अडीअडचणी विविध योजना यासाठी कार्यरत असते. आज कोरोना माहमरी च्या काळात सर्वात जास्त नुकसान कोणाचे झालं असेल तर ते व्यापाऱ्यांचे. सतत ची टाळेबंदी यामुळे संपूर्ण डबघाईला आलेला व्यापार त्याचबरोबर आर्थिक संकटात सापडलेला व्यापारी या सर्व गोष्टींना नवी उभारी देण्यासाठी आज जिल्ह्यातील व्यापारी महासंघ कार्यरत आहे. या व्यापारी महासंघाच्या माध्यमातून सध्याच्या काळात व्यापाऱ्यांसाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत व या सर्व गोष्टींसाठी स्थानिक व्यापार्याचेही सहकार्य आवश्यक आहे कोणाच्या काळात झालेले नुकसान सर्वतोपरी भरून काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी कोणतीही तक्रार न करता जोमाने कामाला लागले पाहिजे जेणेकरून आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल या सर्व बाबींमध्ये ज्या कोणत्या अडचणी येतील त्यासाठी व्यापारी महासंघ सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. यातील सर्वात मोठी बाब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांसाठी कमी व्याजदराने कर्ज व ठेवींवर जास्त व्याज तसेच इन्शुरन्स क्लेम अशा विविध योजनांच्या माध्यमातून व्यापाराचा आर्थिक आलेख उंचावण्याचा प्रयत्न करीत आहोत असे प्रतिपादन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री प्रसाद पारकर यांनी आपल्या भाषणात केले त्याचप्रमाणे व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री नितीन वाळके यांनीही व्यापाराविषयी ही बहुमोल मार्गदर्शन केले महामारीच्या च्या काळातील अडचणींवर मात करून आज व्यापारी उभा राहिला आहे. या व्यापाराच्या उभारीला मजबुती देण्यासाठी जिल्हा व्यापारी पत संस्था कार्यरत आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना कर्ज सुविधा ठेवींवर व्याज सुविधा पिग्मी कलेक्शन यांसारख्या योजना जिल्हा व्यापारी पतसंस्था राबवित आहे. म्हणूनच व्यापाऱ्यांनी जिल्हा महासंघाला संलग्न राहुल या सर्व योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा येणाऱ्या अडचणी साठी जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा व्यापारी पतसंस्था सक्षम आह
खारेपाटण बाजारपेठ ही इतिहासकालीन बाजारपेठ आहे पूर्वीचा इतिहास बघता संपूर्ण जिल्ह्याचा व्यापार हा खारेपाटण इथून व्हायचा परंतु सततच्या येणाऱ्या सुख नदीच्या पूर संकटामुळे येथील व्यापार रोडावला आहे दरवर्षी येणारी हे संकट योग्य ती उपाययोजना करून कसे निवारता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे व्यापारी महासंघाच्या मदतीने शासन दरबारी यासंदर्भात आवाज उठवून सुख नदीतील गाळ काढणे पात्राचे रुंदीकरण अशा उपाययोजना करून हे संकट टाळण्याचा प्रयत्न नक्की करण्यात येईल खारेपाटण व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष मंगेश गुरव यांनी यासंदर्भात व्यापारी संघाकडे विनंती केली असता तात्काळ व्यापारी संघाने याची दखल घेऊन नक्कीच कार्यवाही करू असे आश्वासन दिले
दिनांक 31 जानेवारी रोजी कणकवली येथे संपन्न होणाऱ्या जिल्हा व्यापारी संघाच्या महा मेळाव्याला ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री दिपक बेलवलकर यांनी केले त्याचप्रमाणे खारेपाटण व्यापाऱ्यांच्या विविध अडचणींसाठी व्यापारी महासंघाचे लक्ष वेधण्याचे काम आपल्या मनोगतामध्ये व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री वीरेंद्र चिके यांनी केले
मान्यवरांसोबत व्यासपीठावर खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्र चिके, उपाध्यक्ष चंद्रकांत शेटये तसेच माजी पंचायत समिती सभापती श्री कांताआप्पा शेट्ये,श्री सचिन सप्रे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री मोटे सर यांनी केले . सकाळच्या सत्रामध्ये श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते दुपार च्या सत्रामध्ये जैन मुनी 108 स्वभाव सागर जी महाराज यांचे व्यापाराविषयी बहुमोल मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. रात्रि डबलबारी चा ट्वेंटी ट्वेंटी सामना आयोजित केला होता.
खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या वतीने यशस्वी उद्योजक म्हणून श्री अनिकेत निग्रे या युवा उद्योजकाला पुरस्कार देण्यात आला अत्यंत कठीण परिस्थितीतून आपल्या आईसोबत अनिकेत याने कोकणी मेवा बनवण्याचा उद्योग सुरू करून जिल्ह्यातील विविध ठिकाणी या उद्योगाचा प्रसार करण्यात यशस्वी झाला आहे यासाठी त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. प्रशांत अकिवटे या व्यापाऱ्याचा ही सन्मान करण्यात आला कठीण परिस्थितीतुन पुन्हा व्यापार उभा केल्या बद्दल हा सन्मान करण्यात आला.
खारेपाटण व्यापारी संघटनेचा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा महासंघाचे सदस्य व खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री योगेश गोडवे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष श्री प्रशांत गाठे, श्री सुधिर कुबल, श्री राजू वरुणकर, खजिनदार संजय धाक्रस, रमेश जामसंडेकर, नारायण कोळसुलकर, केतन आलते, मदन लाल गेहलोत, भाऊ राणे,बाळू गाठे तसेच खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या कार्यकारणी व सभासदांनी बहुमोल सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री मंगेश गुरव यांनी केले.

