ओटवणे येथे आज मनसेच्या आरोग्य शिबिराचा शुभारंभ

ओटवणे येथे आज मनसेच्या आरोग्य शिबिराचा शुभारंभ

*कोकण  Express*

*ओटवणे येथे आज मनसेच्या आरोग्य शिबिराचा शुभारंभ…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

ओटवणे येथे रवळनाथ वाचनालयात मनसेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचा शुभारंभ आज करण्यात आला. दरम्यान उद्या पर्यंत या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.

यावेळी उद्योजक रविंद्र कुडाळकर, मनसे सावंतवाडी शहर अध्यक्षआशिष सुभेदार, उप शहराध्यक्ष शुभम सावंत, कळणे विभाग अध्यक्ष अभय देसाई, रविंद्र गावकर, आत्माराम गावकर, संतोष कासकर, प्रभाकर गावकर, सगुण गावकर, संतोष भैरवकर, सुधीर तळवडेकर, ज्ञानेश्वर गावकर, संतोष तारी यांच्यासह डॉ. रघुनाथ गावडे आदी उपास्थित होती.

माजी आम. परशुराम उपरकर व संतोष भैरवकर मनसे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या प्रयत्नांतून समाजाप्रती असलेली बांधिलकीची जाणीव म्हणून आज हे शिबीर घेण्यात आले, असे मनसेच्यावतीने सांगण्यात आले. तेजस्वीनी हेल्थ केअर यांच्या माध्यमातून आज मनुष्याला होणारी अनेक रोगराई पहाता संपुर्ण शारीरिक तपासणी अॅ्नयुप्रशर व फिजीओ तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते. यामधे हृ्दय व मेंदुच्या कार्यक्षमता तपासणीपासून ते मनुष्याच्या ४० प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. ग्राामीण भागातील शेतकरी हा किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करीत आला आहे. यामुळेच किरकोळ स्वरूपाच्या आजारांचे रुपांतर मोठ्या आजारात होत आहे. या मोठ्या आजारांना ब्रेक लागण्यासाठी अशाप्रकारची आरोग्य शिबीरे आयोजीत करण्याची गरज आहे, असे प्रतीपादन रविंद्र कुडाळकर यांनी केले.

ओटवणेतील या शिबीराचा शनीवारी शुभारंभ झाला असून हे शिबीर रविवारपर्यंत सुरू रहाणार आहे. ओटवणे गावात मनसेच्यावतीने ठेवण्यात आलेले हे पहिलेच अश्याप्रकारचे आरोग्य शिबीर असावे, यामुळे इतरही राजकीय पक्षांनी गावा गावत अशा प्रकारची मोठी आरोग्य शिबीरे भरवण्याची गरज आहे. सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, संतोष सावंत प्रभाकर गावकर, रामदास पारकर विनायक मेस्त्री, रवींद्र म्हापसेकर दिनेश गावकर यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!