*कोकण Express*
*कणकवली अर्बन निधी लिमिटेड या वित्तीय संस्थेच्या चेअरमनपदी प्रा.हरीभाऊ भिसे व व्हाईस चेअरमनपदी डॉ.सुभाष सावंत यांची निवड*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
भारत सरकार मान्यता प्राप्त कणकवली अर्बन निधी लिमिटेड या संस्थेच्या रूपाने कणकवली शहर व तालुकावासीयांच्या सेवेत दाखल झाले आहोत ,कणकवली शहरात प्रथमच होणाऱ्या कणकवली अर्बन निधी लिमिटेड या वित्तीय संस्थेच्या चेअरमनपदी प्रा.हरीभाऊ भिसे व व्हाईस चेअरमनपदी डॉ.सुभाष सावंत यांची निवड झाली आहे ,या संस्थेच्या सेक्रेटरीपदी श्री. रंजन चव्हाण व ट्रेझरर पदी श्री. प्रितम पारकर यांची निवड झाली आहे ,या वित्तीय संस्थेमध्ये लखपती योजना ,सुलभ शिक्षण योजना,मुदत ठेव योजना, पेंशन योजना, मासिक ठेव योजना अशा विविध आकर्षक योजनांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे तसेच विविध कर्ज सुविधा देखील यासंस्थेमार्फत नागरिकांना उपलब्ध होणार आहेत
भारत सरकारच्या मान्यतेने आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी आपल्या कणकवली शहरात निर्माण केलेली ही वित्तीय संस्था आहे, भारत सरकारच्या निधी कंपनीच्या उद्देशानुसार कामगार वर्ग भाजीविक्रेते, छोटे मोठे व्यावसायिक,उद्योजक, शासकीय अशासकीय सेवेतील सेवा निवृत्त कर्मचारी अशा सर्व स्तरातील लोकांना बचतीची सवय लावणे त्यावर योग्य स्वरूपात व्याजरूपी परतावा देणे व त्यांच्या अडीअडचणीच्या काळात त्वरित व माफक व्याजदरात बचतीच्या आधारावर व तारण कर्जाची उपलब्धता करून देणे असा संस्था स्थापने मागचा उद्देश आहे
अशा उद्देशाने निर्माण झालेली वित्तिय संस्था आपल्या मनातील बँक आहे, या संस्थेचे ATM सुरू करण्याचा व परिसरामध्ये शाखा विस्तार करण्याचा मानस आहे
या संस्थेच्या संचालक मंडळामध्ये सौ. सुरेखा भिसे, सौ. युगंधारा सावंत,सौ.रुपाली चव्हाण ,सौ. प्राची पारकर यांची डायरेक्टर या पदावर निवड करण्यात आली आहे तसेच सन्माननीय सल्लागार मंडळामध्ये श्री. दीपक बेलवलकर, डॉ. विद्याधर तायशेटे, ऍड.राजेंद्र रावराणे, श्री.अशोक करंबेळकर, श्री.दामोदर खानोलकर, श्री. गणेश जेठे, श्री. विजय चव्हाण, श्री. प्रसाद घाणेकर, श्री.निलेश महेंद्रकर, श्री.अमर पारकर, श्री.विशाल कामत, सौ.लीना काळसेकर यांची निवड करण्यात आली आहे
विनम्र व तत्पर सेवा देणारा आमचा कर्मचारी वर्ग आणि आम्ही संचालक सदैव आपल्या सेवेसाठी सदैव आपल्या सोबत असणार आहोत,आपला विश्वास जिंकणे हाच आमचा हेतु आहे, आपल्या सर्व सभासदांची व संस्थेची भरभराट करण्यासाठी आपलेही योगदान अपेक्षित आहे, यासाठी संस्थेस अवश्य भेट द्या,तसेच संस्थेचे भागदारक(शेअर होल्डर) होऊन व खातेदार होऊन आम्हास उपकृत करावे ही विनंती संस्थेद्वारे करण्यात आली आहे. तसेच २६ जानेवारी रोजी तहसीलदार सन्मा.श्री.आर. जे. पवार आणि प्रांताधिकारी सन्मा.श्रीम.वैशाली राजमाने यांच्या शुभहस्ते होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्यालयात सत्यनारायण पूजा ठेवण्यात आली आहे तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेचे चेअरमन प्रा. हरीभाऊ भिसे यांनी केले आहे
संस्थेचा पत्ता-
१०५/पहिला मजला घेवारी कॉम्प्लेक्स बाजारपेठ, कणकवली ता. कणकवली, जि.सिंधुदुर्ग ४१६६०२
संपर्क
९४२२६३३०२३, ९४२२४९००५३

