सावंतवाडी सभापती निकिता सावंत अपघातात जखमी

सावंतवाडी सभापती निकिता सावंत अपघातात जखमी

*कोकण Express*

*सावंतवाडी सभापती निकिता सावंत अपघातात जखमी*

*बांदा ः लवू परब*

सावंतवाडी पंचायत समिती सभापती सौ. निकिता नाना सावंत यांच्या दुचाकीचा डिंगणे येथे अपघात झाल्याने त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अवकाळी पावसामुळे रस्ता निसरडा बनल्याने हा अपघात झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सभापती सौ सावंत या नेहमीप्रमाणे सावंतवाडी येथून डिंगणे येथे आपल्या ताब्यातील दुचाकीने घरी जात होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पडलेल्या अवकाळी पावसाने रस्ता निसरडा झाला होता. सौ सावंत यांची दुचाकी डिंगणे ग्रामपंचायत समोर घसरून अपघातग्रस्त झाली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले त्यांच्या उजव्या पायाच्या हाडाला दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताची बांदा पोलिसात नोंद असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!