*कोकण Express*
*वरवडे सोसायटीत एकमेकांसमोर ठाकलेल्या भाजपाच्या दोन्ही गटांनी व्यक्त केली राणेनिष्ठा*
*सिंधुदुर्ग : मयुर ठाकूर*
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वरवडे गावातील सोसायटी निवडणूक भाजपाच्याच दोन गटांत झाली. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पक्षीय समर्थन असणारीच पॅनेल निवडणुक रिंगणात बहुतांशी दिसून येतात. मात्र वरवडे गावात शिवसेना राष्ट्रवादी अथवा काँग्रेस चा पुरस्कृत एकही उमेदवार सोसायटी निवडणुकीत उभा नव्हता हे विशेष. राणेंच्या वरवडे गावाच्या सोसायटी निवडणुकीत भाजपाविरोधी एकाही पक्षाला उमेदवारच मिळाला नाही हे सत्य आहे.या पार्श्वभूमीवर भाजपाच्या ज्या दोन गटात वरवडे गावची सोसायटी निवडणूक झाली त्या गटप्रमुख प्रकाश सावंत आणि सोनू सावंत यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. प्रकाश सावंत आणि सोनू सावंत यांनी या निवडणुकीनंतर सांगितले की स्थानिक पातळीवर जरी आम्हा कार्यकर्त्यांत मतभेद असले तरी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आम्ही एकच छत्र मानतो ते म्हणजे आमचे गावचे सुपुत्र केंद्रीयमंत्री आदरणीय नारायण राणे. आज झालेल्या सोसायटी निवडणुकीत आपल्या गटाचे वर्चस्व स्थापित करू पाहणाऱ्या भाजपाच्या दोन्ही गटप्रमुखांचे हे शब्द त्यांची राणेनिष्ठा सांगून जातात. वरवडे गाव हा एकजुटीने राणे कुटुंबियांच्या पाठिशीच होता , आहे आणि राहणार हेच यातून अधोरेखित होते.

