कणकवली पं स रिक्त उपसभापतीपदी मिलिंद मेस्त्री यांचे नाव निश्चित

कणकवली पं स रिक्त उपसभापतीपदी मिलिंद मेस्त्री यांचे नाव निश्चित

*कोकण  Express*

*कणकवली पं स रिक्त उपसभापतीपदी मिलिंद मेस्त्री यांचे नाव निश्चित*

*कणकवली : मयुर ठाकूर*

प्रकाश पारकर यांनी राजीनामा दिल्यानंतर कणकवली पं स च्या रिक्त असलेल्या उपसभापतीपदी भाजपा कणकवली ( ग्रामीण ) तालुकाध्यक्ष तथा पं. स. मिलिंद चंद्रकांत मेस्त्री यांचे नाव निश्चित झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. मिलिंद मेस्त्री हे राणे कुटुंबियांचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.प्रकाश पारकर यांची उपसभापतीपदी निवड करतानाच भाजपा तालुकाध्यक्षपदी यशस्वी सूत्रे हाताळणाऱ्या मिलिंद मेस्त्री यांनाही न्याय देण्याचा शब्द पक्षश्रेष्ठींनी दिला होता. त्यानुसार कणकवली पं स च्या रिक्त असलेल्या उपसभापतीपदी मिलिंद मेस्त्री यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!