अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण

*कोकण  Express*

*अल्पवयीन मुलीचे अपहरण*

*कणकवली तालुक्यातील संशयिताला मालवण पोलिसांनी केली अटक*

*मालवण न्यायालयाकडून जामीन मंजूर*

*संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरुप पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले*

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी ओंकार विजय भावे (वय २९) रा. कळसुली कणकवली याला मालवण पोलिसांनी अटक करून सोमवारी मालवण न्यायालयात हजर केले असताना त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी ८ जानेवारी रोजी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नंतर भारतीय दंड संहिता कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी मालवण पोलिसांनी ओंकार याला माणगाव येथून ताब्यात घेतले. दरम्यान अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेण्यात आले असून योग्य ती कार्यवाही पूर्ण करून तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अशी माहिती मालवण पोलिस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिली.

मालवण पोलिसांनी संशयित आरोपीला मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे कोर्टात हजर केल्यावर तीन दिवसाची पोलिस कस्टडी मागितली. मात्र मे. न्यायालयाने पोलिस कस्टडी मागणी फेटाळून न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर आरोपीतर्फे दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी अंती मे. न्यायालयाने आरोपीची पंधरा हजाराच्या जामीनावर मुक्तता केली. संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरुप पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!