संदीप चौकेकर यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

संदीप चौकेकर यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

*कोकण  Express*

*संदीप चौकेकर यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार*

*तर हळवल उपसरपंच अरुण राऊळ यांना समाज मित्र पुरस्कार*

*कणकवली : मयुर ठाकूर*

कणकवली तालुक्यातील हळवल येथील लिंगेश्वर कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा सामाजिक कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार संदीप चौकेकर यांना प्रदान करण्यात आला. तर हळवल उपसरपंच अरुण राऊळ यांना समाज मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संदीप चौकेकर हे प्राणजीवन सहयोगी संस्थेचे संस्थापक असून कोरोना काळात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सॅनिटायझर करणारे एकमेव सामाजिक कार्यकर्ते होय.

या सोबतच प्राणजीवन सहयोगी संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात त्यांचे समाजाप्रती असलेले अमूल्य योगदान पाहता लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष लवू परब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून गेली २० वर्षे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. अशीच समाजाप्रती आवड असलेल्या व्यक्तींचा दरवर्षी या मंडळामार्फत सन्मान केला जातो. हळवल उपसरपंच तथा लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते अरुण मारुती राऊळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सण २०२१ /२२ चा समाज मित्र हा पुरस्कार अरुण राऊळ यांना सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र परब, अध्यक्ष लवू परब, माजी अध्यक्ष सुभाष परब, वागदे माजी ग्रामपंचायत सदस्य राजू गावडे, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी राकेश चव्हाण, भास्कर राणे, राजू राणे, अरुण राणे, मारुती सावंत, उपाध्यक्ष भरत गावडे, वामन परब, दीपक राऊळ, खजिनदार राकेश गावडे, सचिव दीपेश परब, पत्रकार गिरीश परब, विकास गावडे, मनोज वाटेगावकर, श्रीकृष्ण यादव, मंगेश गावडे, सचिन परब, सुरेश पाडावे, शिवा राणे, प्रशांत गावडे, दशरथ परब, संतोष परब, आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश परब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!