*कोकण Express*
*कुडाळात भगव्या कपड्यातले “गोसावी” दाखल?*
*कुडाळ निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर एका मोठ्या राजकीय पक्षाकडून हे दोन गोसावी सध्या कुडाळ शहरात आणण्यात आले असल्याची चर्चा*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळात भगव्या कपड्यातले “गोसावी” दाखल झाले आहेत. कुडाळ निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर एका मोठ्या राजकीय पक्षाकडून हे दोन गोसावी सध्या कुडाळ शहरात आणण्यात आले आहेत. सध्या कुडाळ शहरात हे फिरताना दिसत आहेत. भगवे कपडे घातलेले हे दोन गोसावी एका राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर वारंवार फिरताना दिसत आहेत. कोणत्याही परिस्थितीत कुडाळ नगरपंचायत जिंकायची यासाठी लिंबुटिंबु चे प्रकार जिल्ह्यात प्रसिद्ध असताना कुडाळ शहरातील ही प्रसिद्ध नगरपंचायत जिंकण्यासाठी एका राजकीय पक्षाकडून जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत.
कुडाळात निवडणुकीसाठी पहिल्यांदाच या “गोसावीं” चा वापर करण्यात येत आहे. हे गोसावी चारही प्रभागांमध्ये सध्या फिरताना दिसत आहेत.हे फिरण्याचे गुपीत नेमके काय? त्यामुळे या राजकीय पक्षांचा नेमका हेतू काय? अशा प्रकारची अंधश्रद्धा समाजात पसरून नेमक काय साध्य करायचे आहे? या गोसावींच्या फिरवण्याने नेमक दडलय काय?अशी जोरदार चर्चा कुडाळ शहरात सुरू झाली आहे. हया “गोसावी” नेमके कोणी आणले? याची पोलिसांनी चौकशी करून संबंधित गोसावींची सखोल चौकशी केल्यास बरेच बिंग फुटण्याची शक्यता आहे. सत्ता ताब्यात घेण्यासाठी अघोरी प्रयत्न केले जात असल्यामुळे कुडाळच्या जनतेमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.या गोसावीचे फोटो सध्या कुडाळातील सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहेत.
