*कोकण Express*
*बेसावधपणे घरा बाहेर पडताय सावधान!*
*कणकवली पटवर्धन चौकात पुन्हा टेस्टिंग सुरु*
*कणकवली : मयुर ठाकूर*
कणकवली पटवर्धन चौकामध्ये आज पासून कोरोनाच्या आरटीपीसीआर व रॅपीड तपासणीसाठी सुरुवात करण्यात आली असून कणकवली शहरात कोरोना संसर्ग वाढू नये व विनाकारण फिरणाऱ्यांंवर चाप बसावा यासाठी प्रशासनाने पुन्हां कणकवली पटवर्धन चौक येथे कोरोना तपासणीला सुरुवात केली आहे.
या तपासणी ठिकाणी कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी ज्यांना ज्यांना लक्षणे आढळतील त्यांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने भजीविक्रेते,फळ विक्रेते, व्यापारी व लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या करण्याच्या सूचना यावेळी मुख्याधिकारी तावडे यांनी दिल्या. आरोग्य कर्मचारी नीलम कांबळे ,नगरपंचायत कर्मचारी सतीश कांबळे, विनोद सावंत ,रमेश कदम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.