शिवसेनेच्या बॅनर वरून पालकमंत्र्यांच्या फोटो गुल्ल?

*कोकण Express*

*शिवसेनेच्या बॅनर वरून पालकमंत्र्यांच्या फोटो गुल्ल?

*कणकवलीतील पटवर्धन चौकातील घटना*

*शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर*

कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवलीत पटवर्धन चौकात शिवसैनिकांनी लावलेला बॅनर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडल्याची घटना घडल्याने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे समोर आले आहे. कणकवली पटवर्धन चौकात जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या अभिनंदनाचा बॅनर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आला होता. हा बॅनर लावल्यानंतर या बॅनर मध्ये पालकमंत्री उदय सामंत यांचा फोटो गायब झाल्याचे चित्र दिसून आले . त्यानंतर शिवसेनेच्या काही निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी कणकवली पटवर्धन चौकात शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांचा लावलेला बॅनर फाडून टाकला. हा बॅनर फाडतेवेळी चा फोटो देखील निदर्शनास आला.

पालकमंत्र्यांचा फोटो लावला नसल्याने हा बॅनर फाडल्या ची माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून देण्यात आली. मात्र या प्रकाराने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी मात्र चव्हाट्यावर आली आहे. कणकवलीत शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी सुरू असतानाच पालकमंत्री उदय सामंत यांचा एका बॅनर वर फोटो नसल्याने शिवसैनिकांन मधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये असलेली गटबाजी मात्र समोर आल्याने आता याबाबत शिवसेनेचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

*

*कणकवलीतील पटवर्धन चौकातील घटना*

*शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!