बांदा-सटमटवाडी येथे वॅगनारला इको कारची धडक

बांदा-सटमटवाडी येथे वॅगनारला इको कारची धडक

*कोकण  Express*

*बांदा-सटमटवाडी येथे वॅगनारला इको कारची धडक…*

*बांदा ः लवू परब*

रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या इको कारची वॅगनारला जोरदार धडक बसून भीषण अपघात घडला. ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाराप-पत्रादेवी महामार्गावर बांदा-सटमटवाडी टोलनाका परिसरात घडली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. तर बांदा पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता अपघाताबाबत अद्याप कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त इको कार गोव्याच्या दिशेने जात होती. यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या वॅगनारला तिची जोरदार धडक बसली. या अपघातात वॅगनारच्या क्लिनर साईडचे तर इकोच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात कोणी जखमी झाले का? याबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही. दरम्यान बांदा पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता अपघाताबाबत कोणती नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!