शिडवणे नं. १ शाळेत बालिका दिन संपन्न 

शिडवणे नं. १ शाळेत बालिका दिन संपन्न 

*कोकण  Express*

*शिडवणे नं. १ शाळेत बालिका दिन संपन्न*

*नवचेतना महिला उद्योग समूहाच्या वतीने बक्षीस वितरण* 

*कासार्डे ः संजय भोसले*

कोहिनुर व्यवसाय प्रशिक्षण केंद्र व नवचेतना महिला उद्योग समूह कणकवली यांच्या सौजन्याने शिडवणे नं. १ शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या प्रकल्प संचालिका सिया गावडे , सदस्या आस्था पाटणकर , मुख्याध्यापक सुनील तांबे , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर , अंगणवाडी मदतनीस केतकर , शालेय पोषण आहार स्वयंपाकी शुभांगी गोसावी आणि शाळेतील सर्व मुले उपस्थित होती.
त्यावेळी संस्थेच्या वतीने इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलींच्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये एकूण बारा मुलींनी सहभाग घेतला. त्यामध्ये अनुक्रमे पूनम संतोष गुंडये , सानिया संतोष सुतार आणि जागृती श्रीधर भोवड या मुलींना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाबद्दल सन्मानचिन्ह , प्रमाणपत्रे देऊन समारंभपूर्वक गौरवण्यात आले. सहभाग घेतलेल्या सर्वांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच सर्व मुलांना व मुलींना वही , पेन भेट म्हणून देण्यात आले.
प्रकल्प संचालिका सिया गावडे म्हणाल्या , “ आमची संस्था शिक्षण , आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी कार्य करीत असून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणे हे उद्दिष्ट आहे. ग्रामीण व शहरी भागातील गरजू महिलांना शिका व कमवा या संकल्पनेतून घरबसल्या रोजगार मिळावा हाही उद्देश आहे. सदर बालिका दिनाचे औचित्य साधून आम्ही शिडवणे शाळेत पहिलाच शैक्षणिक कार्यक्रम घेतला असून त्याला आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
दिव्या दिनेश रांबाडे , सानिया संतोष सुतार आणि नंदिनी दिगंबर मेस्त्री या तीन मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा केली होती. दिव्या रांबाडे हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व महिलांचा मुख्याध्यापक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी केले. मुख्याध्यापक सुनील तांबे यांनी सर्वांचे आभार मानले. संस्थेच्या सदस्या आस्था पाटणकर यांनी शाळेने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!