*कोकण Express*
*रस्ताच्या कामाला सुरूवात करतो म्हणून खोटे आश्वासन; अद्याप काम सुरू नाही..*
*बांधकाम विभागाच्या कार्यालय समोर उपोषण छेडण्याचा इशारा
*मळेवाड कोंडूरे प्रभारी सरपंच हेमंत मराठे*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
रस्ताच्या कामाला सुरूवात करतो म्हणून तारीखेचे आश्वासन देवून काम सुरू न केल्याने 17 डिसेंबरला कार्यकारी अभियंता यांना रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांचे फोटो व आयोडेक्स मलम भेट देवून सकाळीं 10 वाजता सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय समोर उपोषण छेडण्याचा इशारा मळेवाड कोंडूरे प्रभारी सरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे.
सावंतवाडी मळगाव निरवडे न्हावेली मळेवाड मार्गे आरोंदा हा रस्ता खड्डेमय बनला असून अपघाताला कारणीभूत ठरत आहे.वेळोवेळी भेट घेऊन तोंडी व लेखी मागणी करूनही डांबरीकरणाचे काम सुरू न केल्याने मळेवाड कोंडूरे प्रभारी सरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता याना उपोषणाचे निवेदन दिले होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मराठे याना उपोषण करू नका. येत्या आठ दिवसात रस्त्याच्या खड्डे बुजविणे व डांबरीकरण कामाला सुरुवात करतो असे आश्वासन ठेकेदार समोर दिले होते. मात्र हे आश्वासन हवेत विरले असून त्याचा विसर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला पडल्याने मळेवाड कोंडूरे प्रभारी सरपंच मराठे हे 17 तारखेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ रस्त्यावरील खड्डाचे फोटो भेट देणार असून त्याबरोबर आयोडेक्स मलम भेट देणार आहेत.वाहन धारकांना या खड्ड्यातून गाडी चालवत असताना शारीरिक त्रास होऊन मणक्याचे, मानेची, कमरेची हाडे खिळखिळी झाली असून त्यामुळे वाहन धारकांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.याची कल्पना यावी यासाठी हाडांच्या सापळ्याची प्रतिकृती भेट देवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बोर्डाला हाडांच्या एक्स-रे ची माळ घालणार आहेत. रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याची मागणी पूर्ण न झाल्याने रस्त्यालगत वाढलेल्या झाडीच्या मोळ्या बांधकाम कार्यालय समोर टाकून त्यावर बसून 17 डिसेंबर रोजी सकाळीं 10 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालय समोर उपोषण छेडणाऱ असल्याचा इशारा हेमंत मराठे यांनी दिला आहे.

